अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील किन्ही , बहिरोबावाडी परिसरात गेली पाच , सहा महिन्यांपासून दोन बिबट्यांचा वावर आहे. या बिबट्यांनी आतापर्यंत अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केलेले आहेत.(leopard news) 

बिबट्याचे किन्ही , बहिरोबावाडी परिसरात नित्यनेमाने वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना दर्शन होत आहे. सोमवारी राञी किन्ही येथे कान्हुर रोडवरील किनकर वस्तीलगत असलेल्या कैलास किनकर या शेतकऱ्याच्या शेतात गाजदिपुर

येथील मेंढपाळ बांधव नामदेव करगळ यांचा मेंढ्यांचा वाडा मुक्कामी असताना बिबट्याने राञी अचानक करगळ यांच्या घोड्यावर हल्ला केला या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती वन विभागास दिली आहे. या परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असुन , त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक ञस्त झालेले आहेत.

यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून ,आतापर्यंत बिबट्यांकडुन अनेक पाळीव प्राण्यांना लक्ष्य केले गेले आहे.

वन विभागाने या परिसरात एकच पिंजरा लावलेला आहे.एका पिंजऱ्यांने बिबट्याला जेरबंद करणे अशक्य आहे. त्यामुळे या भागात अजुन पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे.