अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Weather :- अहमदनगर जिल्ह्यात आलेली उष्णतेची लाट कमी झाली असून आता पुढील पाच दिवस विदर्भात तीव्र उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

असे असले तरी नगरकरांची उकाड्यातून इतक्यात सुटका होणार नाही. किमान चारपाच दिवस तरी कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे.

वेधशाळेने वर्तविलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत विदर्भातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येतील असे सांगण्यात आले आहे.

अकोले, वर्धा. यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी रेड सिग्नल देण्यात आला आहे. ३० एप्रिल ते २ मे या काळात ही लाट अधिक तीव्र राहणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातही दोन दिवस तापमान ४३ अंशाच्या पुढे गेले होते. काल ते ४३.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. आता त्याच किंचित घट होणार असली तरी दिवसाचे कडक उन आणि रात्रीच्या उकाड्यातून नगरकरांची इतक्यात सुटका होण्याची शक्यता आहे.