Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सिन्नर तालुक्यात मिरजगाव मधील एका ज्योतिष्याकडे भविष्य पाहिले त्यावर निशाणा साधला आहे. तसेच शिंदे यांच्यावर अनेक नेत्यांनी टीका केली आहे. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरजगावमधील एका ज्योतिष्याकडे भविष्य पहिल्याच्या बातम्या सकाळपासून येत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे.
शरद पवारांनी यावरून मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आहे. ते म्हणाले, आत्मविश्वास नसला की ज्योतिष पाहावं लागतं. पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
शरद पवार यांना सरकार कोसळणार असल्याची विधाने करण्यात येत असल्याचे विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे सरकार कधी कोसळेल हे मी सांगू शकणार नाही.
माझा त्यावर विश्वास नाही. मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही. हल्ली आपण नवीन गोष्टी पाहात आहोत, महाराष्ट्रात जे कधी घडलं नव्हतं. ते घडत आहे. ठिक आहे, असेही पवार म्हणाले आहेत.
पुढे बोलताना पवार म्हणाले, आसाममध्ये काय घडले ते सर्व देशांनी पहिले. आता पुन्हा आसामची ट्रिप होणार आहे. वर्तमानपत्रातच आम्ही या बातम्या वाचतो. कार्यक्रम बंद करून शिर्डीला जाणे जाणे. त्यानंतर दुसरीकडे जाऊन हात दाखवणे या गोष्टी महाराष्ट्राला नवीन आहे.
हे राज्य पुरोगामी आहे. विज्ञानाचा पुरस्कार करणारे राज्य म्हणून लौकीक आहे. त्या राज्यात या गोष्टी पाहायला मिळत आहेत. आत्मविश्वासाला धक्का बसतो तेव्हा लोक अशा गोष्टीकडे जातात. ज्योतिषाला हात दाखवतात, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
मध्यावधीचे भाष्य मी कधीच केले नाही. इथे कुणी केले असेल, ते मला माहीत नाही. पण मी कधी भाष्य केले नाही. मध्यावधी होईल की नाही हे सांगण्याच्या मी स्थितीत नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.