मुंबई : महाराष्ट्रात (Maharshtra) नुकतीच राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha elections) पार पडली आहे. यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) वाकयुद्ध सुरु झाले आहे.

भाजपकडून (BJP) शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका करण्यात येत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.

राज्य सभा निवडणुकीमध्ये भाजपने वर्चस्व गाजवल्याचे चित्र स्पष्ट झाले तर महाविकास आघाडीच्या ३ जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघडीवर भाजपचे नेते जोरदार टीकास्त्र सोडत आहेत.

नुकतीच देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक (Presidential election) जाहीर झाली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघडीकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच आता महाराष्ट्रात आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचा चेहरा. मात्र शरद पवार किंवा इतर कोणीही अजूनही याविषयी चर्चा केलेली दिसत नाही.

मात्र काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. नाना पटोले यांनी एक महत्वाचं आणि सूचक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहाल आहे की

“महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल तर याचा मला आनंदच होईल. शरद पवारांकडे राष्ट्रपतीपद येणार असेल तर काँग्रेसचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल” अशा प्रकारचं ट्विट नाना पटोले यांनी केले आहे.

आता शरद पवार किंवा महाविकास आघडीतील नेते याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात याकडे सर्वजण आतुरतेने पाहत आहेत. महाविकास आघाडी शरद पवार यांचा चेहरा राष्ट्रपती पदासाठी देणार का याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.