ICICI Bank:  खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक ICICI बँकेच्या (ICICI Bank) ग्राहकांसाठी (customers) एक आनंदाची बातमी आहे. खाजगी क्षेत्रातील बँक ICICI बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी FD दर वाढवण्याची घोषणा केली आहे. ICICI बँकेच्या ग्राहकांना आता FD ठेवींवर अधिक व्याजाचा लाभ मिळणार आहे.


FD व्याज किती मिळेल

ICICI ने आपल्या FD दरात 5 बेस पॉईंटने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने एफडी दरात ही वाढ आजपासून म्हणजेच 22 जून पासून केली आहे. 2 कोटींपेक्षा कमी एफडी ठेवींवर हे व्याज वाढवण्यात आले आहे.

ICICI बँकेच्या वेबसाइटवर मिळालेल्या माहितीनुसार, बँकेच्या ग्राहकांना आता 7 ते 14 दिवसांच्या FD वर 2.75 टक्के व्याज मिळणार आहे. त्याचबरोबर 91 ते 120 दिवसांच्या FD वर आता 3.75 टक्के व्याजाचा लाभ मिळणार आहे. तर 185 ते 210 दिवसांच्या FD वर 4.65 टक्के आणि 290 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर बँकेला 4.65 टक्के व्याज मिळेल.

बँक 390 दिवस ते 15 महिन्यांच्या एफडीवर 5.35 टक्के आणि 18 महिने ते 2 वर्षांच्या एफडीवर 5.35 टक्के व्याज देईल. तर 3 वर्षे एक दिवस ते 5 वर्षे मुदतीच्या FD वर 5.7 टक्के, 5 वर्षे एक दिवस ते 10 वर्षे मुदतीच्या FD वर आता 5.75 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल.

ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याज
आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, आयसीआयसीआय बँकेने करमुक्त एफडीवरील व्याजदर 5.7 टक्के कमी केले आहेत. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांना या सर्व एफडीवर 0.50 टक्के अधिक व्याज मिळेल.

एफडीवरील व्याज का वाढले?

या महिन्याच्या 8 तारखेला आरबीआयने (RBI) रेपो दरात (Repo Rate) वाढ केली होती. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढ केली असून, त्यानंतर रेपो दर 4.9 टक्के झाला आहे. आरबीआयने रेपोमध्ये वाढ केल्यापासून असे मानले जात होते की बँका ग्राहकांना एफडीवर जास्त व्याजाचा लाभ देतील.