Government scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. या निमित्त भाजपतर्फे देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

तामिळनाडु भाजपने मात्र यानिमित्त खास घोषणा केली आहे. मोदींच्या जन्मदिनी जन्माला येणाऱ्या मुलांना सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. याशिवाय इतरही काही योजना असून यात ७२० किलो मासेही वाटले जाणार आहेत.

तामिळनाडूचे माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री एल मुरुगन यांनी ही माहिती दिली आहे. त्यांना सांगितले की, या योजनेसाठी चेन्नईतील एका सरकारी रुग्णालयाची निवड केली आहे.

याठिकाणी १७ तारखेला जन्माला येणाऱ्या सर्व मुलांना सोन्याची अंगठी दिली जाईल. प्रत्येक अंगठी जवळपास २ ग्रॅम सोन्याची असेल.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्माला येणाऱ्या मुलांचे स्वागत करण्याचा या मागे हेतू आहे. या दिवशी मोदी ७२ वर्षांचे होणार आहेत.

त्यामुळे तामिळनाडुत ७२० किलो मासे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मतदारसंघाची निवड केली आहे. याचा पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा उद्देश मासे उत्पादनाला प्रोत्साहन देणे आहे, असेही त्यांना सांगितले