अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- जिल्हाधिकारी यांच्या नूतन इमारतीचे काम पूर्ण झाले असून ही इमारत राज्यात नंबर वन ठरणार आहे. या जिल्हाधिकारी भवनाचे उद्घाटन बुधवार दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. (Collector Office)

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीतून सुरू आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर नगर शहराच्या पूर्व दिशेला शहराबाहेर होता.

मात्र, बदलत्या काळात शहराचा झपाट्याने विस्तार होत गेला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर शहराच्या मध्यवस्तीत आला.

तसेच या सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यालयातील इमारती बहुतांशी जुन्या आणि मोडकळीस आलेल्या असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासाठी

नवीन भवन उभारण्याची संकल्पना पुढे आली. सन २०१४ च्या सुरुवातीस या भावनाच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली होती.