अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात सध्या पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यातच विजेच्या कडकडाटासह मुसळधार सरी कोसळू लागल्या आहेत. यातच पारनेर तालुक्यात एक मोठी दुर्घटना घडल्याची घटना घडली आहे.

पारनेर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामध्ये वडनेर हवेली येथील एकाच्या घरावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने हे कुटुंबीय शेजारील खोली झोपले असल्याने त्यांचे प्राण बालंबाल बचावले आहे.

मात्र या उर्घटनेत सुभाष बबन बढे यांच्या घरातील संसारपयोगी वस्तु जळाल्या तसेच घराचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवारी रात्रीच्या दरम्यान अचानक विजेचा कडकडाट होऊन घरावर मोठा विजेचा लोळ पडला. यात घरातील संपूर्ण संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून घर पूर्णपणे उध्वस्त झाले.

सुभाष बबन बढे व त्यांचे कुटुंबिय शेजारच्या खोलीत झोपलेले असल्याने बचावले. कामगार तलाठी मोहिनी साळवे यांनी पंचनामा केला आहे.

तसेच वडनेर हवेली परिसरात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. याचे देखील पंचनामे महसूल विभागाच्यावतीने तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे.