मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर आंदोलक एस.टी कर्मचाऱ्यांकडून (S.T Staff) हल्ला करण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस यंत्रणेवर (Police system) प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशातच अजित पवार (Ajit Pawar) यांनीही पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

अजित पवार यांनी बोलताना मीडियाला (Media) कळले पण पोलिसांना कळाले नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. शरद पवार यांच्यावरील हल्ल्यानंतर निर्माण झाला होता. त्यानंतर महाविकास आघडीचे बरेच मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेले होते.

अजित पवार यांनी गृहमंत्रालयाबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे गृहमंत्रालय हे राष्ट्रवादीकडेच (NCP) आहे आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) गृहमंत्री आहेत.

असं असतानाही थेट पवारांच्या घरावर एस.टी. आंदोलक चाल करुन गेले आणि ना गृहमंत्र्यांना, ना पोलीसांना त्याचा थांगपत्ताही लागला नाही याचं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, पण ह्याच्यामध्ये माझं स्पष्ट मतंय, वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्याचं काम त्यांचं असतं. त्यामध्ये ही लोकं कुठं तरी कमी पडली हे निर्विवाद सत्यय.

कारण ती लोकं जेव्हा तिथं आलेली होती, त्यांच्यामागे मीडियाचे पण कॅमेरे आहेत. मीडियाचे कॅमेरे येतात म्हणजे मीडिया बरोबर माहिती घेतं, मीडियाचं पण ते काम आहे, कुठं काय चाललंय ते अॅक्युरेटपणे दाखवायचा प्रयत्न करायचा.

मग हे जर मीडियानं शोधून काढलं तर पोलीस विभागाच्या संबंधीत यंत्रणेला का नाही शोधून काढता आलं. त्याबद्दल एका वरिष्ठ अधिकाऱ्याला चौकशी करायला सांगितलं आहे. असे अजित पवार यांनी सांगितले आहे.