Ahmednagar News:गर्भनिरोधक गोळ्यांसह उत्तेकज औषधांचा बेकायदा साठा असलेल्या गोदामावर पोलिसांना छापा घातला आहे.

राहुरीतील बारागाव नांदूर रोडवरील एका गोदावर पोलिसांना हा छापा घातला आहे. तेथे सुमारे एक कोटी रुपयांची अवैधरित्या साठा केलेली औषधे आढळून आली आहेत. पोलिसांनी याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली असून त्यांचे एक पथक येऊन तपासणी करीत आहे.

श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे. येथे केवळ साठाच नव्हे तर बेकायदेशीरपणे विक्रीही सुरू असल्याचे आढळून आले आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून चौकशी केली जाईल, त्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.