IMD alert : देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. काही भागात मान्सूनचा कहर पाहायला मिळाला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच शेकडो लोकांचे या मान्सून च्या पावसात जीव गेले आहेत. येत्या काही दिवसात देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सून सध्या देशभरात उच्च पातळीवर आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्वच राज्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने आता पुढील चार ते पाच दिवस काही भागांबाबत अलर्ट (Alert) जारी केला आहे. पुढील चार ते पाच दिवस मध्य, पश्चिम, पूर्व आणि दक्षिण भारतात मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज IMD ने वर्तवला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये आज (29 जुलै) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशात आजपासून ३१ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडेल.

उत्तराखंडमध्ये २९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. हरियाणामध्ये २९ आणि ३० जुलै रोजी मुसळधार पाऊस पडेल. तसेच, 31 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पंजाब, उत्तर हरियाणा इत्यादी राज्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 29 जुलै रोजी पूर्व मध्य प्रदेश, किनारपट्टी आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो.

झारखंडमध्ये 31 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस पडेल. त्याचवेळी बिहारबद्दल बोलायचे झाले तर 29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस पडेल.