IMD Alert Maharashtra : पुन्हा एकदा राज्यात पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत झालेल्या परतीच्या पावसाने थैमान घातल्यानंतर पाऊस जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु हवामान खात्याचा नवा अंदाज समोर आल्याने पुन्हा पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. देशाच्या अति उत्तर आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी, तर उर्वरित देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो.

मागच्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये पाऊस वाढणार

नोव्हेंबर महिन्यात देशात 29.7 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होते. दरम्यान ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे दक्षिण भारतातील राज्यात पावसाचे प्रमाण या कालावधीत जास्त असते. दक्षिण भारतात नोव्हेंबरमध्ये सरासरी 118.9 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा नोव्हेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक (123 टक्क्यांपेक्षा जास्त) पावसाचा अंदाज आहे.

तर दुसरीकडे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील बहुतेक भागात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहेत्यामुळे या महिन्यात थंडी गायब होणार आहे. राज्यात मागच्या काही दिवसापासून थंडीत कमालीची वाढ पहिला मिळत आहे.

नोव्हेंबरमध्ये राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान हे सरासरी व त्याहून अधिक राहण्याचा अंदाज आहे, तर वायव्य भारत आणि हिमालय पर्वताच्या पायथ्याकडील भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

कमाल तापमानाची स्थिती पाहता देशात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा घट होण्याची शक्यता आहे. पूर्व भारतातील राज्यांसह ईशान्येकडील राज्यांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल, असेही हवामान विभागाच्या तज्ञांनी माहिती दिली.

हे पण वाचा :-  SIM Card : ग्राहकांना धक्का ! आता ‘या’ कागदपत्रांवर घेता येणार नाही सिमकार्ड ; सरकार करत आहे नियमांत बदल