IMD Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. संततधार आणि मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Warning alert) देण्यात आला आहे.

राज्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे पाणी प्रश्न सुटला आहे. तसेच चांगला आणि समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे र काही भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडेल. हा अंदाज हवामान खात्याने (Department of Meteorology) व्यक्त केला आहे. त्यानुसार राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. यापैकी 9 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात १४ ते १६ सप्टेंबर, ठाणे, मुंबई १५ सप्टेंबर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक जिल्ह्यात १४ सप्टेंबरला आणि पुणे जिल्ह्यात १४ आणि १५ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला होता.

आठवडाभर राज्यभर पावसाने हजेरी लावली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पावसाने दणका दिला. मंगळवारपासून काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तर हवामान खात्याने शनिवारपर्यंत काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र (Maharashtra) यांचा समावेश आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातून पावसाने माघार घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, ठाणे आणि मुंबईत 14 ते 16 सप्टेंबर, रायगड जिल्ह्यात 16 आणि 17 सप्टेंबरपर्यंत, रत्नागिरीत १५ ते १७, सिंधुदुर्गात १४ ते १६ सप्टेंबर, नंदुरबार आणि नाशिकमध्ये १५ सप्टेंबर, कोल्हापुरात 15 आणि 16 सप्टेंबर, तर साताऱ्यात 15 ते 17 या काळात मध्यम ते मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.