अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 PM Kisan : मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्र शासनाने या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक करून दिले आहे.

आता या योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या नियमात देखील मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी या गोष्टीची खबरदारी बाळगावी लागणार आहे अन्यथा त्यांना असुविधेचा सामना करावा लागू शकतो.

वास्तविक, गेल्या काही महिन्यांपूर्वी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आवश्यक केले होते.

यामुळे या योजनेच्या अनेक लाभार्थ्यांनी त्यांच्या फोनवरून घरी बसून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र आता यामध्ये मोठा बदल करण्यात आला असून आता या योजनेच्या लाभार्थ्यांना आपल्या मोबाईलवरुन केवायसी करता येणे अशक्य आहे.

आता मोबाईल द्वारे ई-केवायसी करता येणार नाही. म्हणजेच आता ई-केवायसी करण्यासाठी, लाभार्थ्यांना आपल्या आधार कार्डसह कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच सीएससीमध्ये जावे लागेल. जिथे शेतकऱ्यांना बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी करावे लागेल.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटवर नुकत्याच काही दिवसापूर्वी ई-केवायसीशी संबंधित एक सूचना देण्यात आली आहे.

या वेबसाईटवर ई-केवायसी प्रक्रियेसंदर्भात एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की, ओटीपी आधारित eKYC प्रक्रिया काही काळ स्थगित करण्यात आली आहे.

यामुळे शेतकऱ्यांना मोबाईल द्वारे केवायसी करता येणार नाही. असे असले तरी ही सेवा काही काळापुरती तात्पुरती स्थगित केली गेली आहे. यामुळे ही सेवा लवकरच बहाल केली जाऊ शकते.

मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. आधी यासाठी केंद्र सरकारने 31 मार्च शेवटची तारीख ठेवली होती मात्र शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येत असल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख सरकारने नुकतीच वाढवली आहे.

आता या योजनेसाठी ई-केवायसी करण्याकरता 31 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मित्रांनो, अजून एक महत्वाची बाब म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 11 व्या हफ्ता लवकरच वितरित केला जाणार आहे.

यासाठी लवकरच सरकारद्वारे तारीख जारी केली जाणार आहे. 11व्या हफ्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्याची शक्यता आहे.