अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- वाढत्या महागाईमुळे जनता होरपळून निघाली आहे. दरदिवशी किंमतीमधील होणाऱ्या वाढ़मुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे. मात्र यातच एक माहिती समोर येत आहे. यामुळे गृहिणींना दिलासा मिळणार आहे.

सरकारने खाद्यतेलांच्या किमती कमी करण्यास आणि सणासुदीच्या काळात घरगुती वापरातील गोष्टींचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलल आहे.

खाद्य तेलांच्या आयात शुल्कात कपात केल्यानंतर केंद्र सरकारने आता पाम, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील कृषी उपकर आणि कस्टम ड्युटी कमी केली आहे.

त्यामुळे दिवाळीआधीच खाद्यतेलाचे भाव उतरण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वी, केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील मूलभूत सीमाशुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे तेलांच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या. आता सरकारने पाम तेल आणि सूर्यफूल तेलावरील कृषी उपकर आणि कस्टम ड्युटी कमी केली आहे.

कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील मूलभूत शुल्क 2.5 टक्क्यांवरून शून्यावर आणण्यात आले आहे.

कृषी उपकर क्रूड पाम तेलासाठी 20 टक्क्यांवरून 7.5 टक्के आणि कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या सूर्यफुलाच्या तेलावर 5 टक्के करण्यात आला आहे.