साईभक्तांसाठी महत्वाची बातमी… 31 डिसेंबर रोजी मंदिर ‘या’ वेळेत बंद राहणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नव्या निर्बंधानुसार रात्री 9 ते सकाळी 6 जमावबंदी लागू करण्यात आली आहे.(saibaba)

यामुळे 31 डिसेंबर रोजी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान राज्य शासनाने 7 ऑक्टोबरपासून काही अटी-शर्तीवर धार्मिकस्थळे खुली करण्याचे आदेश दिलेले होते.

त्यानुसार श्री साईबाबांचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आलेले होते. परंतु सध्या देशात व राज्यात करोना विषाणूचा ओमायक्रॉन या व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेता 25 डिसेंबर 2021 रोजी पासून रात्री 9 ते सकाळी 6 जमावबंदी लागू केलेली आहे.

त्याअनुषंगाने संस्थानच्यावतीने रात्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शन व आरतीसाठी भाविकांना बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त 31 डिसेंबर रोजी रात्रीही श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. याबाबतची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!