अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- कोरोनामुळे शेक्षणिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. यातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने राज्यात आजपासून कॉलेज सुरु होत आहे.
यातच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक महत्वाची माहिती समोर येत आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी फेरपरीक्षेचा निकाल आज, 20 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.

विद्यार्थी www.mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहू शकतील. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण उपलब्ध होतील तसेच सदर माहितीची प्रिंटआऊटही घेता येईल.
अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयांची गुण पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना http://verification.mh-ssc.ac.in या तर बारावीच्या विद्यार्थ्यांना http://verification.mh-hsc.ac.in वर अर्ज करता येईल.
गुण पडताळणीसाठी 21 ते 30 ऑक्टोबर तर छायाप्रतीसाठी 21 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. त्यासोबतच ऑनलाइन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, नेट बँकिंग याद्वारे भरता येईल.
2021 या वर्षी पहिल्यांदाच नोंदणी करून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/ सुधार योजनेअंतर्गत परीक्षेस पुन्हा बसण्याची संधी दिली जाणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम