अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  नाशिकमध्येही गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

लसीकरण नसेल तर रेशन मिळणार नाही, लवकरच नाशिकमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात देखील कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे.

यातच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. नाशिक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या 1461 वर पोहचली आहे.

त्यामुळे इतर जिल्ह्यांप्रमाणेच नाशिकमध्येही 10 आणि 12 वीचे वर्ग सोडून इतर वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भुजबळ यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली.

लसीकरण नसेल तर रेशन मिळणार नाही, लवकरच नाशिकमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यातही असा कटू निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घ्यावा लागू शकतो, हा सर्व राज्यांसाठी इशारा आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

भुजबळांचा नाशिककरांना इशारा नाशिकमध्ये यापुढे दोन्ही लस घेतलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे, लसीकरण करा, कठोर निर्बंध लावण्यास भाग पाडू नका, असा इशाराही छगन भुजबळ यांनी नाशिककरांना दिला आहे.