file photo

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  शैक्षणिक शुल्क माफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही अनेक महिने उलटले तरी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने अद्याप कार्यवाही न केल्यामुळे संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने अखेर आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे.

वैद्यकीय पदव्यूत्तर अभ्यासक्रमांची शैक्षणिक शुल्क माफी, कोविड प्रोत्साहन भत्ता, वसतिगृह (हॉस्टेल) समस्या, बीएमसी रेसिडेन्टचा टीडीएसचा मुद्दे आदी विविध प्रश्न सेंट्रल मार्डच्या शिष्टमंडळाने राज्य शासनाची भेट घेऊन मांडले होते.

राज्य शासनाने हे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत अद्याप ठोस काहीच निर्णय घेतला नाही. त्यामुळे अखेर निवासी डॉक्टरांनी 1 ऑक्टोबर पर्यंत मागणी मान्य न झाल्यास संपावर जाण्याचे स्पष्ट केले.

संपामध्ये या सेवा बंद ठेवणार :-

– सर्व बाह्य रूग्ण सेवा (ओपीडी)

– सर्व नियोजित शस्त्रक्रिया, नियोजित प्रक्रिया

– स्थिर रुग्ण कक्षातील कार्य – स्थिर रुग्णांच्या तपासण्या सबंधित कार्य

– सर्व लसीकरण कार्यक्रम

या संपामध्ये पुढील सेवा सुरु ठेवणार :-

– अपघात विभाग (casaulty)

– सर्व अतिदक्षता विभाग, कोविड

– सर्व तात्काळ करवायच्या, जीवन-आवश्यक शस्त्रक्रिया व प्रक्रिया

– सर्व जीवन-आवश्यक संबंधित विविध तपासण्या

– ज्या महाविद्यालयातील जिल्ह्यात पूर-सदृश्य परस्थिती आहे तिथे सर्व आवश्यक तात्काळ सेवा, आपत्ती-निवारणा आवश्यक सेवा सुरु राहतील.