file photo

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन राजधानी मुंबईत सुरू आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षाने राज्य सरकारला राज्यातील अनेक प्रश्नांवरुन घेरले आहे.

त्यातच, राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी आत्महत्यासंदर्भात एक माहिती दिली. हि माहिती ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसणार आहे.

अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, सावकाराचं कर्ज यांसारख्या अनेक समस्यांना कंटाळून बळीराजाने जीवनयात्रा संपवल्याच्या अनेक घटना घटना घडल्या आहे.

अशीच एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात जून 2021 ते ऑक्टोबर 2021 या 5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मंत्री वडेट्टीवार यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितले कि, राज्यात गेल्या 5 महिन्यात 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीतील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा पाहिल्यास दररोज 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं भयावह चित्र राज्यात आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी 491 शेतकऱ्यांना जिल्हा स्तरावरील समित्यांकडून राज्य सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभही देण्यात आला आहे.

या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना योजनेंतर्गत आर्थिक मदत पोहचविण्यात आल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं मूळ कारण कर्जाचं ओझं आणि ते चुकीविण्यास ते समर्थ नसणे हेच आहे.