मुंबई : रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) प्रकरणावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी भाजपच्या (Bjp) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (chitra wagh) यांच्यावर खोचक टीका केली आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, शेवटी दूध का दूध पाणी झालं. काही लोकं स्त्री सुरक्षेतचा टाहो फोडत असतात. पण स्वत: च्या राजकारणाच्या हवाशापोटी पीडित मुलीचे आयुष्य उद्धवस्त केलं आहे. मंदीत संधी साधणारे हे लोक आहे, यांच्याबद्दल पीडितेनं खुलासा केला आहे’ असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, रघुनाथ कुचिक प्रकरणात पीडित मुलीने याबद्दल तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये पीडित मुलीने वैद्यकीय तपासणी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने पीडितेची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली. तिला जी मदत लागेल ती देण्यात आली’ असेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.

तसेच ‘राज्य महिला आयोगाच्या वतीने पीडितेला पूर्ण न्याय दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी त्या पीडितेचा मला फोन करून बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिची लवकरच भेट घेणार आहे.

पण, या प्रकरणात काही धागेदोरे आहे, कुठल्या व्यक्तीला बदनाम करत आहे, याची माहिती घेऊन कडक कारवाई केली जाईल असेही रुपाली चाकणकर यांनी ठणकावून सांगितले आहे.

त्याचसोबत, ‘घाणेरडे राजकारण करत वैयक्तिक फायद्यासाठी एका मुलीच आयुष्य चित्रा वाघ यांनी उध्वस्त केले असेही रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना खडेबोल सुनावले आहे.