file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :-राज्यात आज 3,187 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 253 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.

तसेच राज्यात आतापर्यंत 63 लाख 68 हजार 530 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे. राज्यात करोना रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याचं चित्र आहे.

दुसरी लाट ओसरत असल्याने प्रशासनाने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. दुसरीकडे, भारतात सुरू असलेल्या करोना लसीकरण मोहिमेने मंगळवारी आणखी एका विक्रमाची नोंद केली.

आता प्रत्येक चार लाभार्थींपैकी एका भारतीयाचे पूर्ण लसीकरण झाले आहे. कोविड -19 लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर आठ महिन्यांनी,

भारतात मंगळवारी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या आता अंदाजे 25 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, मंगळवारी 53 लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले. ज्यामुळे देशातील लसीकरणाची संख्या एकूण संख्या 87.59 कोटी झाली.