अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-   राहता बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याच्या ७,६३७ गोण्यांची आवक झाली असून, प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त २,८०० तर सोयाबीनला जास्तीत जास्त ६,१४४ रुपये इतका भाव मिळाला आहे.

राहता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कांदा नंबर एक ला २,४०० ते २,८००, कांदा नंबर दोन ला १,५५० ते २,३५० रुपये व कांदा नंबर तीन ला उन्हाळी ६०० ते १,५०० रुपये भाव मिळाला आहे.

तसेच गोल्टी कांद्याला १,८०० ते २,००० रुपये आणि जोड कांद्याला १०० ते ५०० रुपये भाव मिळाला आहे. यासोबत सोयाबीनला कमीत कमी ५,६०० ते जास्तीत जास्त ६,१४४ रुपये भाव मिळाला आहे.

तर सरासरी ६,००० रुपये क्विंटलला भाव मिळाला आहे. तसेच डाळींबाला कमीत कमी २५० रुपये ते जास्तीत जास्त ४,५०० रुपये भाव मिळाला आहे.

तर सरासरी २,५०० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला आहे. चिकुला कमीत कमी २५० रुपये, जास्तीत जास्त २,५०० रुपये तर सरासरी १,५०० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला आहे.