अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे नेतेमंडळी देखील आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जनता विरोधकांना त्यांची जागा दाखवेल अशी टिका आमदार मोनिका राजळे यांनी कळसपिंप्री येथे केली.

यावेळी आमदार राजळे यांनी तालुक्यातील विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. पाथर्डी तालुक्यामध्ये तुमचे सरकार आहे, तर तुम्ही कोणती विकास कामे केली आहेत? एखादी दुसरी संस्था तुमच्या ताब्यामध्ये जनतेने दिली तर तिथे काय सुरु आहे हे सर्व तालुका पहात आहे.

यापुढील काळामध्ये जनता आपल्या सोबत आहे. केंद्रात भाजपाची सत्ता आहे. मोठया प्रमाणत निधी केंद्राकडुन राज्यांना देण्यात येत आहे.

राज्यसरकार हा निधी वाटपामध्ये भेदभाव करत आहे. मतदार संघामध्ये अतिवष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे राज्यसरकारने दुर्लक्ष केले असून शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी सज्ज व्हावे व विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज असल्याचे राजळेंनी सांगीतले.