अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- काल जिल्ह्यातील विविध भागात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला. या पावसात पाथर्डी तालुक्यात तिन ठिकाणी विज कोसळून एक म्हैस एका बैलाचा मृत्यू झाला आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काल रात्री देखील पाथर्डी तालुक्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसात तालुक्यातील भोसे गावातील एका शेतकऱ्याच्याबैलाच्या अंगावर वीज कोसळली त्यातच त्याचा मृत्यु झाला.

त्यानंतर एक शेतकरी जनावरे चारुन घरी जात असताना त्यांच्या म्हसीवर विज पडली.यात म्हैस मृत्यु पावली. मोहटादेवी गडावर विजेच्या विजरोहीत्रावर विज पडल्याने विज पुरवठा खंडीत झाला.

त्या पाठोपाठ नगर तालुक्यातील जेऊर शिवारातील पिंपळगाव तलाव परिसरात गंगाधर विठ्ठल माळी यांच्या घरासमोर बांधलेल्या गाईच्या अंगावर वीज पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे.