Categories: भारत

POK मधील १५ लाँच पॅडस दहशतवाद्यांनी भरले..लेफ्टनंट जनरल म्हणतात..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- जम्मू-काश्मीरचा विषय धगधगता ठेवण्यासाठी पुढच्या काही दिवसात सीमेपलीकडून घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज लष्कराचे टॉप कमांडर लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू यांनी व्यक्त केला आहे.

त्याच कारण असा आहे की पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व दहशतवादी तळ आणि १५ लाँच पॅडस दहशतवाद्यांनी पूर्ण भरले आहेत. मागच्या ३० वर्षांपासून पाकिस्तानकडून सातत्याने या घुसखोरांना मदत केली जातेय.

भारतीय हद्दीत या दहशतवाद्यांना सहजतेने घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानने आतापर्यंत अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानला प्रत्येक वेळी भारताने जशास तसे, चोख प्रत्युत्त दिले आहे.

काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा खात्मा करुन दहशतवादाचे कंबरडे मोडले आहे. काश्मीरचा विषय धगधगता ठेऊन दहशतवाद जिवंत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रयत्न वाढू शकतात असे राजू म्हणाले.

पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीला भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळत असल्यामुळे पाकिस्तान असहाय्य बनला आहे. त्यांना त्यांच्या हेतूमध्ये यश मिळत नाहीय’ असे राजू म्हणाले.

सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानातही करोना रुग्णांची संख्या वाढतेय पण पाकिस्तानने दहशतवादाची साथ सोडलेली नाही.पीओकेमधील हे सर्व दहशतवादी भारतासाठी उद्या डोकेदुखी ठरणार आहेत. त्यामुळे तिथे आणखी एका स्ट्राइकची गरज आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24