अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- पुरुषप्रधान देशात आज देशातील महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. महिलांच्या कलागुणांना वाव मिळवा यासाठी देशातील एका राज्याने अतिशय कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वात आयोजित पंजाब मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला आहे.
पंजाब सरकारने महिला सशक्तीकरणाच्या दिशेने दमदार पाऊल टाकत महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
पंजाब मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाने पंजाब नागरी सेवांच्या थेट भरती प्रक्रियेत महिलांच्या आरक्षणाला मंजुरी दिली आहे.
याशिवाय या आयोजित बैठकीत स्टेट रोजगार योजना, २०२० -२२ लाही मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत २०२२ पर्यंत याअंतर्गत राज्यातील एक लाख तरुणांना रोजगार देण्याचे काम केले जाईल.
या योजनेंतर्गत सरकारी विभागांतील रिक्त पदेही भरले जातील. याच वेळी मंत्रीमंडळाने पंजाब सिव्हिल सर्व्हिसेस (रिझर्व्हेशन ऑफ पोस्ट्स फॉर विमेन) रूल्स, २०२० लाही मंजुरी दिली.
यानुसार आता, सरकारी नोकऱ्यांमध्ये थेट भरती तसेच बोर्ड्स आणि कॉर्पोरेशनच्या ग्रुप ए, बी, सी आणि डीच्या पदांवर भर्तीमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले जाणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved