Categories: भारत

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ४ नक्षलवादी ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

रायपूर : सर्वत्र कोरोनाचे सावट असून त्या संकटाबरोबर सर्व यंत्रणा लढत आहे.

परंतु यातही दहशतवादी, नक्षलवादी यांच्या कुरापती सुरूच असल्याचे चित्र आहे.

रात्री उशिराने छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त राजनांदगाव जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली.

यात चार नक्षलवादी ठार झाले. व एक एक पोलीस अधिकारी शहीद झाला आहे.

मदनवाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा पोलीस उपनिरीक्षक श्याम किशोर शर्मा चकमकीत शहीद झाले.

पथक मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परदौनी गावाच्या जंगलातून जात असताना नक्षलवाद्यांशी गाठ पडली.

नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर अचानक गोळीबार सुरू केला.

सुरक्षा दलाने त्यास चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी सुमारे २० मिनिटे गोळीबार झाल्यानंतर नक्षलवादी पळून गेले.

अहमदनगर लाईव्ह 24