Chanakya Niti : मनुष्याच्या जन्मापूर्वीच ठरल्या जातात या 5 गोष्टी, जन्म आणि मृत्यूबद्दल चाणक्य काय सांगतात


मानवी जीवनात आचार्य चाणक्य यांची धोरणे आजही खूप उपयोगी पडत आहेत. आचार्य चाणक्य यांची काही तत्वे आजही मानवाला जीवनात सुखी संसार आणि समृद्ध बनवत आहेत.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीती या ग्रंथामध्ये मनुष्याच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच स्त्री आणि पुरुषांचे नाते कसे असावे याबद्दलही अनके धोरणे सांगितली आहेत. या धोरणांचा मानवी जीवनात आजही उपयोग होत आहे.

मानवाचा जन्म झाल्यानंतर अनेक कर्म तो करत असतो. त्यानुसार त्याला कर्माची फळे मिळत असतात असे अनेकजण सांगत असतात किंवा तुम्ही ऐकले असेल. पण मानवाचा जन्म आणि मृत्यू अगोदरच ठरलेले असते.

आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये सांगितले आहे की मनुष्याच्या जन्मापूर्वीच काही ५ गोष्टी सांगितल्या जातात याचेही वर्णन त्यांनी केले आहे. त्याबद्दल आज जाणून घेऊया…

आयुः कर्म च विद्या च वित्तं निधानमेव च .
पंचैतानि विलिख्यन्ते गर्भस्थस्यैव देहीन: ॥

चाणक्याच्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की, वय, कर्म, धन, ज्ञान आणि मृत्यू या पाच गोष्टी पुरुषाच्या गर्भात आल्यावर एकाच वेळी ठरतात. साधारणपणे त्यात कोणताही बदल होत नाही.

कर्म नाकारता येत नाही

मनुष्य जीवनात आला की तो अनके कर्म करत असतो. मनुष्याचे हे कर्म जन्मापूर्वीच ठरलेले असते. कर्माची फळे मिळतात असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. हे कर्म अगोदरच ठरलेली असतात.

तसेच जन्मापूर्वीच मनुष्याचे वय आणि मृत्यू देखील ठरलेला असतो. त्यामुळे मनुष्याचा जन्म झाल्यानंतर त्याचा मृत्यू कधी होणार आणि तो किती वर्षे जगणार हे देखील ठरलेले असते.

मनुष्य जन्माला येण्यापूर्वीच त्याचे धन आणि ज्ञान देखील ठरलेले असते. त्यामुळे जन्मानंतर मनुष्य किती ज्ञानी बानू शकतो हे त्याच्या हातात नसते तर ते अगोदरपासूनच ठरलेले असते.

धर्मार्थकमोक्षेषु यस्याकोऽपि न विद्यते ।
जन्मानंतर जन्म मातृयेषु मरणं तस्य केवलम्।।

म्हणजे मनुष्याचे जीवन धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार मुख्य उद्देशांसाठी निर्माण झाले आहे. ज्याला या चार गोष्टींपैकी एकही मिळत नाही, तो केवळ मरण्यासाठीच जन्माला येतो. आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाने काम करूनच संपत्ती मिळवली पाहिजे.