Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

7th Pay Commission Salary Hike : कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी! सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या तयारीत, इतका वाढणार पगार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आणखी एक गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. कारण सरकार आता कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होऊ शकते.

7th pay Commission Salary Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांचा DA ४ टक्क्यांनी वाढवून मोठी भेट देण्यात आली आहे. तर आता कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

देशात २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून या निवडणूक डोळ्यासमोर ठेवता कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होऊ शकते.

कर्मचाऱ्यांना DA वाढ करण्यात आल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आता कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के झाला आहे. ४ टक्के DA वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ होणार आहे. ही DA वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू केली जाणार आहे.

फिटमेंट फॅक्टर वाढविण्याचा विचार

कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये देखील सरकारकडून वाढ केली जाण्याची चर्चा सुरु आहे. जर फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाली तर कर्मचाऱ्यांचा मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढेल. 2026 पासून त्याची अंमलबजावणी होऊ शकते.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के दिला जात आहे. तसेच कर्मचाऱ्यांकडून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सरकारकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 पर्यंत वाढवण्याची तयारी

कर्मचाऱ्यांच्या नवीन वर्षातील DA वाढ गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. तसेच कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 पर्यंत वाढवण्याची सरकारकडून तयारी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ

कर्मचाऱ्यांची फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी सरकारकडून मान्य केली जाऊ शकते. ६वा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला तेव्हा कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 1.86 होता.

कर्मचाऱ्यांना जेव्हा ७वा वेतन आयोग लागू केला तेव्हा कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 करण्यात आला आहे. आता ८वा वेतन लागू करण्यापूर्वी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची तयारी सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.