भारत

7th pay Commission : सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट! वेळेआधी मिळणार पगार, या दिवशी खात्यात येणार पैसे, आदेश जारी

Published by
Ahmednagarlive24 Office

7th pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे. कारण आता सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता कर्मचाऱ्यांना वेळेआधीच पगार मिळणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.

त्यामुळे कर्मचाऱ्यांचा सण उत्साहात साजरा होणार आहे. कर्मचाऱ्यांना पूर्ण महिन्याचे वेतन वेळेअगोदर दिले जाणार असल्याने कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना त्यांचा सण उत्साहात साजरा करता येईल असे सरकारचे म्हणणे आहे.

उत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन दिले जाणार असल्याची घोषणा बिहार सरकारकडून करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना वेळेआधीच पगार दिल्याने त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल असे सरकारचे म्हणणे आहे. त्यासाठी सरकारकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

पगार वेळेपूर्वी दिला जाईल

बिहार सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. बिहार राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ केली आहे. तसेच आता पुन्हा एकदा सरकारकडून आनंदाची बातमी देत महिन्याचे मूळ वेतन वेळेआधीच दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे.

बिहार सरकारच्या कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार २० एप्रिल पर्यंतच दिला जाणार असल्याच्या सूचना जारी करण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या वित्त विभागाने हा निर्णय घेतला आहे.

देशभरात 22 एप्रिल रोजी ईदचा सण साजरा केला जाणार आहे. बिहार सरकारकडून अल्पसंख्यांक समाजाचा हासण लक्षात घेता कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन 20 एप्रिलपर्यंत देण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.

त्यामुळे आता बिहारच्या सरकारी कर्मचाऱ्यांना महिना पूर्ण होण्यापूर्वीच पूर्ण महिन्याचा पगार २० एप्रिल रोजी देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा सण उत्साहात साजरा होणार आहे.

महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बिहार सरकारने कर्मचाऱ्यांचा DA ४ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्के होता जो आता ४ टक्के वाढ झाल्याने ४२ टक्के झाला आहे. त्यामुळे वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मे महिन्यापासून दिला जाणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना मागील ३ महिन्याची DA थकबाकी देखील दिली जाणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office