7th Pay Commission Update : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये नुकतीच वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन वर्षातील पहिली DA वाढ १५ मार्च रोजी करण्यात आली आहे.
सरकारकडून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा वाढवला जातो. त्यातील पहिली वाढ मार्च महिन्यात करण्यात आली आहे. तसेच पुढील वाढ देखील लवकरच होईल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे.
कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के झाला आहे. आता लवकरच दुसरी DA वाढ केली जाण्याची शक्यता आहे. सरकारकडून वर्षातून दोनदा DA आणि DR सुधारित केले जाते.
जुलैमध्ये पुन्हा एकदा डीएमध्ये वाढ होऊ शकते
मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना या वर्षीची दुसरी DA वाढ जुलै महिन्यात केली जाऊ शकते. त्यामुळे जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळू शकते. पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ केली जाऊ शकते.
कर्मचाऱ्यांच्या DA आणि DR मध्ये दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये वाढ केली जाते. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो, तर पेन्शनधारकांना महागाई सवलत दिली जाते.
सध्या DA ची गणना कशी केली जाते?
केंद्र सरकार एका सूत्राच्या आधारे कर्मचाऱ्यांसाठी डीए आणि डीआरमध्ये सुधारणा करते.
महागाई भत्ता टक्केवारी = (गेल्या 12 महिन्यांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (आधारभूत वर्ष 2001=100) 126.33)/126.33) x100
केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी: (गेल्या तीन महिन्यांतील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी (आधारभूत वर्ष 2001=100)-126.33)/126.33)x100
सध्याच्या DA वाढीनंतर पगार किती वाढला?
मार्च महिन्यामध्ये केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ केली होती. या वेतनवाढीमुळे 47.58 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांना त्याचा थेट लाभ मिळत आहे.
या DA वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील बंपर वाढ झाली आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा मासिक पगार सुमारे 42,000 रुपये असेल आणि मूळ वेतन सुमारे 25,500 रुपये असेल, तर त्याला महागाई भत्ता म्हणून 9,690 रुपये मिळतात. डीएमध्ये 4% वाढ झाल्यानंतर, 10,710 रुपये महागाई भत्ता म्हणून दिले जात आहेत. अशा परिस्थितीत दरमहा पगारात 1,020 रुपयांची वाढ झाली आहे.