Categories: भारत

बिहारमध्ये वीज कोसळल्याने 83 जण ठार, अनेक जखमी ! मोठ्या प्रमाणात विनाश…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  बिहारमध्ये गुरुवारी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व वादळामुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला. बिहारमध्ये वीज कोसळल्याने 83 जणांचा मृत्यू झाला आहे.

बिहार राज्यातील २३ जिल्ह्यांत वीज कोसळून दुर्घटना घडल्या असून, त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

संध्याकाळी साडे सहावाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील वेगवेगळ्या भागात वीज पडल्यामुळे 83 लोकांचा मृत्यू झाला आहे.तर अनेक जण जखमी झाले आहेत.

बिहार मधील सर्वाधिक मृत्यू हे गोपालगंज जिल्ह्यात झाले आहेत. इथं वीज पडल्यामुळे 13 लोकांनी प्राण गमावलेत. बिहारमधल्या जवळपास 23 जिल्ह्यांमध्ये वीज पडून जीवित तसंच वित्तहानी झाली आहे.

यातील सर्वाधिक मृत्यू गोपाळगंजमध्ये झाले असून त्यात 13 लोकांचा मृत्यू झाला. तर मधुबनी आणि नबाडा येथे 8-8 लोक ठार झाले.

दरम्यान उत्तर प्रदेशातही वीज कोसळल्याने किमान 9 जणांचा मृत्यू झाला. बिहारमधील 23 जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने मानवी हानी झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24