Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

8th Pay Commission Update : कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगाचे मोठे अपडेट, पगार 44% पर्यंत वाढणार! जाणून घ्या सविस्तर

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा नुकताच DA वाढवण्यात आला आहे. पण आता ८व्या वेतन आयोगाबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. त्यामुळे जर हा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागू झाला तर पगारात बंपर वाढ होऊ शकते.

8th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये नुकतीच वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळू शकते. कारण ८व्या वेतन आयोगाबाबत मोठे अपडेट समोर आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगामधील महागाई भत्ता लागू केल्यानंतर आता कर्मचाऱ्यांकडून ८वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली जात आहे. जे मिळायला हवे आहे त्यापेक्षा सरकारकडून कमी दिले जात आहे असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे सरकारी कर्मचारी सतत ८व्या वेतन आयोगाची मागणी करत आहेत. पण सरकारकडून याबाबत कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण दिवसांत लोकसभेची निवडणूक लागणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची सातत्याने ८वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी आणि लोकसभा निवडणूक पाहता सरकारवर दबाव तयार तयार होत आहे. त्यामुळे आता कर्मचारी संघटनांकडून निवेदन तयार करून लवकरच सरकारला सादर केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्रीय कर्मचारी संघटनांकडून सतत फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. फिटमेंट फॅक्टर वाढला तर कर्मचाऱ्यांचा पगार देखील वाढू शकतो. त्यामुळे कर्मचारी देखील सतत फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत.

पगारवाढीमध्ये फिटमेंट फॅक्टरची महत्त्वाची भूमिका असते आणि ती पगार मर्यादेवर निश्चित केली जाते. सध्या किमान वेतन मर्यादा 18000 आहे. जे फिटमेंट फॅक्टरच्या 2.57 पट आहे.

त्याच वेळी, 7 व्या वेतन आयोगात, फिटमेंट घटक 3.68 पट पर्यंत ठेवण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी तयार झाल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन १८ हजार रुपयांवरून २६ हजार रुपयांपर्यंत वाढेल. फिटमेंट फॅक्टर वाढवला गेला तर पगारात देखील बंपर वाढ होऊ शकते.

कर्मचाऱ्यांकडून सतत ८वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. पण आता केंद्र सरकारला कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत ऑटोमॅटिक पे रिव्हिजन सिस्टिम लागू करायची आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार आपोआप वाढू शकतो.

ऑटोमॅटिक पे रिव्हिजन सिस्टिम या प्रणालीवर सरकारकडून काम देखील सुरु करू शकते. यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त महागाई भत्ता असेल तर पगारात आपोआप रिव्हिजन होईल.