अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- विचार करायला लावेल अशी घटना (Incident) केरळमध्ये घडली आहे. एका १७ वर्षांच्या मुलीने आपल्या घरात लहान मुलाला जन्म दिला आहे (A 17-year-old girl has given birth to a baby boy in her home).
आश्चर्याची बाब म्हणजे, कोणत्याही डॉक्टर, हॉस्पिटमध्ये न जाता यू ट्यूब पाहून तिने स्वताची डिलिव्हरी स्वत:च केली आहे. आई-वडिलांना आपली मुलगी गरोदर असल्याची पुसटशीही कल्पना नव्हती.
आता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, या अल्पवयीन तरुणीच्या २१ वर्षांच्या प्रियकाराला (Boy Friend) पोलिसांनी अटक केली आहे.
केरळच्या मल्लापूरम (Mallapuram, Kerala) जिल्ह्यातील ही घटना सून, २० ऑक्टोबरला या अल्पवयीन तरुणीने मुलाला जन्म दिला आहे (Birth To Baby Boy).
डिलिव्हरी होऊन तीन दिवस उलटले, तरी या मुलीच्या अंध आईला, आपल्या मुलीच्या बाळंतपणाची कल्पनाही नव्हती. डिलिव्हरी झाल्यानंतर तीन दिवस ही अल्पवयीन तरुणी तिच्याच खोलीत राहिली.
डिलिव्हरीत झालेल्या इन्फेक्शनमुळे तिला त्रास सुरु झाला, त्यानंतर ती खोलीबाहेर आली, त्यानंतर या तरुणीला आणि तिच्या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अल्पवयीन तरुणीच्या शेजारी राहणारा २१ वर्षांचा तरुणाकडून ही गर्भवती राहिली होती. त्यानेच यू ट्यब पाहून गर्भनाळ तोडण्याचा सल्ला तिला दिला होता.
एकाच घरात राहून या मुलीच्या आईवडिलांना मुलीच्या गरोदरपणाची पुसटशीही कल्पना कशी आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.
या मुलीची आई आंधळी असून, वडील सुरक्षा रक्षक आहेत. बऱ्याचदा कामामुळे वडील रात्री घराबाहेरच राहत असत. मुलीचे ऑनलाइन क्लासेस असल्यामुळे, मुलगी दिवसभर खोलीत दार बंद करुन राहते,
असा तिच्या आईचा समज होता. मुलीच्या घरातील परिस्थितीचा फायदा घेत, शेजारच्या तरुणाने हे सर्व घडवून आणल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.