अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी आज सकाळी सोन्याच्या किंमती पुन्हा खाली आल्या आहेत. याशिवाय आज चांदीचा दरही स्वस्त झाला आहे.
एमसीएक्सवर सोन्याचा मार्च साठीचा फ्यूचर ट्रेड 39.00 रुपयांनी घसरून 47,217.00 रुपयांवर आला. त्याच वेळी मार्च साठीचा चांदीचा फ्यूचर ट्रेड 130.00 रुपयांनी घसरून 68,608.00 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करीत होता.
तब्बल नऊ हजारांनी सोन्याचे दर घसरले :- मागच्या सत्रात सोन्याचे दर 1.2 टक्क्यांनी तर चांदी 2.8 टक्क्यांनी वधारली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 56,200 च्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचलं होतं.
त्यानंतर यंदाच्या वर्षात सोन्याच्या किंमती खूपच अस्थिर असल्याचं पाहायला मिळतं. आता सोन्याच्या किंमती विक्रमी उच्चांकडून 9,000 रुपयांनी घसरल्या आहेत.
घसरणीचं कारण काय? :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये सोन्या-चांदीच्या आयातीवरील शुल्कात 5 टक्क्यांची कपात केली आहे. सध्या 12.5 टक्के असलेलं आयात शुल्क आता 7.5 टक्के झालं आहे त्यामुळे दरातही घसरण झाली आहे.