अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- मुकेश अंबानी आता जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकाच्या यादीत पहिल्या दहामधून बाहेर पडले आहेत.
शनिवारी ब्लूमबर्ग बिलियनेर्स इंडेक्सनुसार मुकेश अंबानी 72.2 बिलियन डॉलर (5.35 लाख करोड़ रुपए) निव्वळ संपत्तीसह 11 व्या स्थानावर आले आहेत. या यादीमध्ये Amazon चे ओनर जेफ बेझोस असून त्यांची संपत्ती 183 अब्ज डॉलर्स आहे.
ऑगस्टमध्ये टॉप-5 मध्ये होते समाविष्ट :- यावर्षी 14 जुलैला मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचले.त्यावेळी त्यांची एकूण मालमत्ता 5.36 लाख कोटी होती. अवघ्या 8 दिवसातच 23 जुलै रोजी त्यांची संपत्ती 1.21 लाख कोटी रुपयांनी वाढून 6.57 लाख कोटी रुपयांवर गेली. ते जगातील पाचवा श्रीमंत माणूस ठरले.
शेअर्समधील शानदार तेजीमुळे मुकेशच्या नेटवर्थमध्ये शानदार तेजी दिसून आली आणि निव्वळ संपत्ती 80.6 अब्ज डॉलर्स (5.96 लाख कोटी रुपये) झाली. 8 ऑगस्ट रोजी, श्रीमंत व्यावसायिकाच्या क्रमवारीत ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात ते चौथ्या क्रमांकावर आले होते.
शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचे परिणाम :- गेल्या आठवड्यात रिलायन्सच्या शेअर्सची विक्री झाली आहे. 16 सप्टेंबर रोजी कंपनीचा शेअर्स 2,324.55 रुपयांच्या भावाने ट्रेड करीत होता,
जो 20 नोव्हेंबरला 18 टक्क्यांनी घसरून 1,899.50 वर बंद झाला. त्याचबरोबर 45 दिवसांत एनएसई मधील रिलायन्स ग्रुपची मार्केट कॅपही 15.68 लाख कोटी रुपयांवरून 12.71 लाख कोटी रुपयांवर आली आहे.
जगातील टॉप-5 श्रीमंत उद्योजक रँक नाव टोटल नेटवर्थ कंपनी ;-
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved