अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- चेन्नईतील एका स्वयंसेवकाने ‘कोविशील्ड’ लसीवर घेतलेले आक्षेप सीरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. संबंधित स्वयंसेवकाचे आरोप हे कुहेतूने केलेले व दिशाभूल करणारे आहेत.
कोव्हिशील्ड ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-अमेरिकी कंपनी अॅस्ट्राझेनेका विकसित करीत आहेत. भारतात त्याचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करीत आहे. तक्रारदाराने नोटिशीद्वारे केलेले आरोप दिशाभूल करणारे आहेत.
स्वयंसेवकाच्या प्रकृतीत बिघाड झाल्याबद्दल आम्हाला सहानुभूती नक्कीच वाटते. परंतु, त्याच्या प्रकृतीतील बिघाडाचा आणि लसीचा काहीही संबंध नाही.
त्यामुळे त्याने लसीवर खापर फोडणे हा निव्वळ खोटारडेपणा आहे. त्यांना जाणवणारा त्रास लसीमुळे होत नसल्याची पूर्ण कल्पना वैद्यकीय पथकाने त्याला दिली होती.
तरीही त्याने याबाबतीत जाहीर आरोप करण्याचा मार्ग अनुसरला. त्याच्या या कृत्यामुळे संस्थेची बदनामी झाली आहे. पैसे उकळण्याच्या हेतूने त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आम्हीच त्यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा करणार दाखल आहोत असेही सीरमने म्हटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved