भारत

कडुलिंबाच्या झाडाला आले आंबे, ग्रामविकास मंत्र्यांच्या बंगल्यासमोर निसर्गाचा चमत्कार

Published by
Ahmednagarlive24 Office

निसर्गामध्ये अनेक चमत्कारी घटना घडतात. निसर्ग हा स्वतःच एक मोठा चमत्कार आहे. दरम्यान सध्या एक झाड प्रचंड चर्चेत आले आहे. हे आहे कडुलिंबाचे झाड. पण विशेष म्हणजे या लिंबाच्या झाडाला आंबे आलेत. आणि विशेष म्हणजे हे झाड पंचायत तथा ग्रामविकास मंत्र्यांच्या बंगल्यात आहे. ते देखील हे पाहून शॉक झालेत.

मध्यप्रदेशचे पंचायत तथा ग्रामविकास मंत्री प्रल्हाद पटेल यांचा हा बंगला सध्या चांगल्याच चर्चेत आहे. त्यांच्या बंगल्याच्या परिसरात कडुलिंबाच्या झाडाला चक्क आंबे लटकले आहेत. या झाडाकडे शनिवारी (२५ मे) मंत्र्यांची नजर पडली तेव्हा ते सुद्धा आश्चर्यचकीत झाले.

याच वर्षी हा बंगला प्रल्हाद पटेल यांना देण्यात आलाय. प्रल्हाद पटेल यांनी स्वतः याबाबत फोटो आणि व्हिडीओ टाकल्यानंतर जास्त चर्चेत हे झाड आले. त्यांचे शनिवारी (२६ मे) या झाडाकडे लक्ष गेले व आश्चर्यचकीत झाले.

मंत्री प्रल्हाद पटेल यांचा हा बंगला भोपाळच्या प्रोफेसर कॉलनीजवळ सिव्हिल लाईनला इ-७ बंगला येथे असून आजूबाजूने मोठमोठी झाडे आहेत. बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर निसर्गाने नटलेला आहे. याच परिसरात एक मोठे कडुलिंबाचे झाड आहे.

या झाडाला आंबे लटकले आहेत. या बंगल्यात सध्या बांधकाम काम सुरु असल्याने पटेल शनिवारी बंगल्याची याची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी बंगल्याचं निरीक्षण करत असताना त्यांची नजर या कडुलिंबावर पडली. यावेळी कडुलिंबाच्या झाडाला आलेले आंब्याच फळ पाहून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

३० वर्षांपेक्षा जुनं असेल झाड
प्रल्हाद पटेल यांनी एक्सवर झाडाचा व्हिडीओ व फोटो शेअर केला असून यासंदर्भात माहिती दिलीये. भोपाळच्या निवासस्थानी असणारे हे झाड कडुलिंबाचं असून या झाडाला आंब्याचं फळ आलेलं आहे.

काही कुशल बागायतदारांनी हा प्रयोग वर्षापूर्वी केला असेल, व हे एक मोठे आश्चर्य आहे. हे झाड सुमारे ३० वर्ष जुने असल्याचा अंदाज असून या झाडाची विशेष काळजी घेण्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले असल्याचे प्रल्हाद पटेल म्हणालेत.

 

Ahmednagarlive24 Office