Aadhaar Card : आपल्या देशात आज अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजे आधार कार्ड . आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आधार कार्डच्या मदतीने आज सरकारच्या अनेक योजनांचा फायदा घेऊ शकतात तसेच सरकारी असो वा खाजगी काम आधार कार्ड प्रत्येकासाठी आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आधार कार्ड जारी केल्यानंतर त्यामध्ये 12-अंकी क्रमांक दिला जातो ज्याला विशिष्ट ओळख क्रमांक म्हणतात. आधार कार्ड तयार करणे आणि त्याची देखभाल करणे UIDAI द्वारे केले जाते. हे जाणून घ्या कि UIDAI ची स्थापना 2016 मध्ये झाली. त्याचवेळी आम्ही तुम्हाला सांगतो की आधार कार्डबाबत मोठी माहिती समोर येत आहे.
आधार कार्ड अपडेट
नमूद केल्याप्रमाणे आधार कार्डबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. हे अपडेट त्या आधार कार्डधारकांसाठी आहे ज्यांनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड बनवले होते. तुमच्या आधार कार्डमधील फोटोमध्ये किंवा नावात काही चूक असल्यास किंवा इतर कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुम्ही ते मोफत अपडेट करू शकता.
खरं तर सध्या UIDAI ओळख आणि पत्त्याचा पुरावा मोफत अपडेट करण्याची संधी देत आहे. UIDAI म्हणते की जर तुम्ही 10 वर्षे किंवा 10 वर्षांपेक्षा जुने आधार कार्ड अपडेट केले नसेल तर तुम्ही आधार कार्ड पूर्णपणे मोफत अपडेट करू शकता.
ओळख आणि पत्त्याचा पुरावा ऑनलाइन अपडेट करण्यासाठी यापूर्वी 25 रुपये आणि आधार केंद्रावर अपडेट करण्यासाठी 50 रुपये आकारले जात होते. पण आता UIDAI अगदी मोफत अपडेट करण्याची संधी देत आहे. हे काम तुम्ही 15 मार्च ते 14 जून या कालावधीत करू शकता.
हे पण वाचा :- Government Scheme : काय सांगता ! ‘या’ लोकांना सरकार देत आहे 10 हजार रुपये ; असा करा अर्ज