Aadhaar Card Update : देशातील प्रत्येक नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र आता UIDAI कडून १० वर्षापेक्षा जास्त जुनी आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितली आहेत. तसेच अनेकांना आधार कार्डवरील फोटो बदलायचा असतो.
आता तुम्हीही घरबसल्या आधार कार्डवरील काही गोष्टी अपडेट करू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नुसार, आधार कार्डधारकाचे नाव, जन्मतारीख, फोन नंबर आणि पत्ता यासारखी माहितीच घरबसल्या बदलता येते.
मात्र बायोमेट्रिक माहिती तुम्हाला बदलायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रात जावे लागेल. या ठिकाणी तुम्ही फोटो आणि बायोमेट्रिक माहिती बदलू शकता.
नाव, पत्ता, जन्मतारीख/वय, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल पत्ता, नातेसंबंध स्थिती यासारख्या गोष्टी लोकसंख्याशास्त्रात येतात. बुबुळ, बोटांचे ठसे आणि चेहऱ्याची प्रतिमा ही बायोमेट्रिक डेटाची उदाहरणे आहेत.
आधार कार्ड फोटो कसा बदलायचा
तुम्हालाही तुमच्या आधार कार्डवरील बदलायचा असेल तर तुम्हाला आधार सेवा केंद्रात जावे लागेल. कारण आधार कार्डवरील फोटो तुम्ही घरबसल्या बदलू शकत नाही. आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख/वय, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल पत्ता तुम्ही घरबसल्या बदलू शकता.
मात्र फोटो बदलण्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रात जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला आधारकार्डवरील फोटो बदलण्यासाठी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुमचा आधारकार्डवरील फोटो बदलता येईल.
तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या.
आधार केंद्राला भेट देण्यापूर्वी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पूर्व-क्रमांक घेणे आवश्यक आहे.
आवश्यक फॉर्म भरा
ते आधार नोंदणी केंद्राच्या कार्यकारिणीकडे जमा करा.
कार्यकारी तुमच्या बायोमेट्रिक तपशीलांची पडताळणी करेल आणि एक नवीन छायाचित्र घेईल.
आधार कार्डमधील फोटो बदलण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही.
फोटो बदलण्यासाठी/अपडेट करण्यासाठी तुम्हाला १०० रुपये द्यावे लागतील
तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल
तुमचे नवीन छायाचित्र तुमच्या आधार कार्डवर ९० दिवसांच्या आत अपडेट केले जाईल, त्यानंतर तुम्ही पीव्हीसी किंवा डिजिटल दस्तऐवज डाउनलोड करू शकता.