Aadhar Card News : आधार कार्ड हरवले आहे? टेन्शन घेऊ नका, घरबसल्या असा करा नवीन आधारकार्डसाठी अर्ज; जाणून घ्या प्रक्रिया

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card News : केंद्र सरकारकडून देशातील सर्व नागरिकांसाठी आधारकार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धपर्यंत आधार कार्ड असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडील आधार कार्ड हरवले असेल तर काळजी करू नका. आता घरबसल्या सोप्या पद्धतीने तुम्ही आधार कार्ड मिळवू शकता.

तुमच्याकडील कागदपत्रांपैकी आधार कार्ड हे देखील अतिशय महत्वाचे कागदपत्र बनले आहे. कोणत्याही खाजगी किंवा सरकारी ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्ही कामानिमित्त गेला तर तुम्हाला आधार कार्ड मागितले जाते.

पण अनेकदा अनेकांच्या आधार कार्डमध्ये काही त्रुटी असतात तर काहींचे आधार कार्ड हरवलेले असते. त्यामुळे अनेकांना नवीन आधार कार्ड काढणे हे डोकेदुखी वाटत आहे. पण आता घरबसल्या सोप्या पद्धतीने तुम्ही आधार कार्ड काढू शकता.

५० रुपये शुल्क आकारला जाईल

जर तुमच्याकडील जुने आधारकार्ड हरवले असेल तर तुम्ही देखील नवीन आधार कार्ड सहज बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त त्रास करण्याची गरज नाही. नवीन आधार कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडून ५० रुपये शुल्क आकाराला जाईल. तसेच नवीन आधार कार्ड काढण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल.

आधार कार्डमध्ये होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट सुरक्षित क्यूआर कोड, जारी करण्याची तारीख आणि कार्डची छपाई अशा अनेक माहिती नमूद केल्या आहेत. त्यामुळे व्यक्तीची सर्व माहिती यामध्ये देण्यात येते.

नवीन पीव्हीसी आधार कार्डसाठी अर्ज कसा करावा

सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या क्रोम ब्राउझरमध्ये UIDAI ची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
यानंतर, तुम्हाला “My Aadhar” च्या विभागात जाऊन “PVC आधार कार्ड ऑर्डर” चा पर्याय निवडावा लागेल.
आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा 12 अंकी किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधार नोंदणी आयडी क्रमांक टाकावा लागेल.
यानंतर तुम्हाला खाली दिलेला कॅप्चा कोड भरा आणि “ओटीपी पाठवा” नावाचा पर्याय निवडा.
आता तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो भरल्यानंतर तुम्हाला “Submit” चा पर्याय निवडावा लागेल.
या प्रक्रियेचे अनुसरण केल्यानंतर, आता तुम्हाला पीव्हीसी आधार कार्डचे पूर्वावलोकन मिळेल.
आता तुम्हाला पेमेंट पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन UPI ​​किंवा नेट बँकिंगद्वारे 50 रुपये शुल्क जमा करावे लागेल.
या प्रक्रियेचे अनुसरण केल्यानंतर, भारतीय पोस्टच्या स्पीड पोस्ट सेवेद्वारे तुमचे आधार कार्ड तुमच्या घरी 5 दिवसांच्या आत वितरित केले जाईल.