अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- जूनमध्ये राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढून रुग्ण वाढू शकतात असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. त्याचा सामना करण्यासाठी आतापासूनच राज्य सरकारनं तयारी सुरू केली आहे.
सध्या कोरोनाच्या निदानासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. मात्र त्याचा रिपोर्ट येण्यासाठी भरपूर कालावधी लागतो. आता मध्य प्रदेश सरकारनं टेस्टचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रू-नेट मशीनने कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तज्ज्ञांच्या मते, ही मशीन टीबीच्या चाचणीसाठी वापरली जाते. कोरोना टेस्टसाठी यामध्ये ट्रूनेट चिप लावावी लागेल.
त्यानंतर यामार्फत कोरोनाची चाचणी होऊ शकते. हे मशीन इन्स्टॉल करण्याची जबाबदारी जिल्हा सीएमएचओंना सोपवण्यात आली आहे.
आतापर्यंत कोरोना टेस्टसाठी मध्य प्रदेशमधील बहुतेक जिल्ह्यांना मोठ्या शहरांवर अवलंबून राहवं लागत होतं. आता जूनमध्ये कोरोना प्रकरणं वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
त्यामुळे राज्य सरकारनं आता कंबर कसली आहे. प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचे सॅम्पल टेस्ट करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात ट्रू-नेट मशीन लावण्यात येत आहेत. ICMR नेदेखील ट्रूनेट मशीनद्वारे कोरोना टेस्ट करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकारनं मध्य प्रदेश सरकारला 69 ट्रूनेट टेस्टिंग मशीन दिल्यात. या मशीन प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवल्या जाणार आहेत.
इंदोर, भोपाळ, जबलपूर, ग्वालियर आणि उज्जैन यासारख्या रेड झोनमध्ये 3-3 मशीन पाठवल्या जाणार आहेत. या मशीनमार्फत दिवसाला 10 ते 15 हजार सॅम्पल टेस्ट होऊ शकता.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com