अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :लॉकडाउननंतर केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी आता दुप्पट, तिप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. कारण लॉकडाउनमुळे आर्थिक फटका बसल्याने महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने केलेल्या दरवाढीनुसार, आता केस कारण्यासाठी १०० ते १२० रुपये मोजावे लागणार आहेत.
याआधी केस कापण्यासाठी ६० ते ८० रुपये दर होता. तर दाढी करण्यासाठी जिथे आधी ४० ते ५० रुपये मोजावे लागत होते तिथे ८० रुपये मोजावे लागणार आहेत. लॉकडाउनचा सर्वच क्षेत्रांना खूप मोठा फटका बसला आहे.
यामुळे लॉकडाउन उठवल्यानंतर जेव्हा सर्व काही सुरळीत होईल तेव्हा विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा एकदा व्यवस्थित करण्याचं आव्हान सर्व क्षेत्रावंर असणार आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने दाढी-कटिंगसह इतर सेवांचा दर तब्बल दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सलून, ब्युटी पार्लर बंद ठेवण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews