अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे गेल्या काही वर्षात एकापेक्षा एक हिट सिनेमे रिलीज झाले आहेत. २०१९मध्ये अक्षयच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ७०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. त्यानंतर तो बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला होता.
बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचे खरे नाव राजीव भाटिया आहे. तो चित्रपटांमध्ये आला आणि स्वतःचे नाव अक्षय ठेवले. अक्षय कुमारला स्वयंपाकाची खूप आवड आहे. त्याने एका रेस्टॉरंटमध्ये कुक म्हणूनही काम केले आहे. जर अक्षय चित्रपटांत आला नसता तर तो शेफ म्हणून काम करत असता. त्याने अनेक कुकिंग शोज होस्ट केले आहेत. एका वृत्तानुसार, अक्षय कुमारने आता पुन्हा एकदा आपल्या मानधनात वाढ केली आहे.
एका रिपोर्टनुसार, अक्षय कुमार आपल्या चित्रपटासाठी १२० कोटी रुपये मानधन घेत होता. मात्र आता त्याने त्याच्या मानधनात वाढ करत १३५ कोटी रुपये केले आहेत. २०२१ मध्ये अक्षय कुमारचे बरेच चित्रपट रिलीज होणार आहेत. यात सुर्यवंशीपासून राम सेतू, रक्षा बंधन, बेलबॉटम, पृथ्वीराज चौहान, अतरंगी रे आणि बच्चन पांडे या चित्रपटांचा समावेश आहे.
अक्षय कुमारची एका वर्षाची कमाई :- अमेरिकन बिझिनेस मॅगझिन फोर्ब्सने नुकतीच 2020 मध्ये जगातील 100 सर्वाधिक कमाई करणार्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. या यादीत अक्षय कुमार हा एकमेव भारतीय असून 52 व्या क्रमांकावर आहे. अक्षयच्या कमाईवर कोरोनाचाही परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्याचे उत्पन्न 88 कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
असे असूनही, तो जॅकी चॅन आणि जेनिफर लोपेझ सारख्या कलाकारांपेक्षा पुढे आहे. 2019 मध्ये त्यांची कमाई ( 444 कोटी रुपये) होती, जी यंदा कमी होऊन 48.5 मिलियन डॉलर (अंदाजे 356 कोटी रुपये) झाली आहे. मागील वर्षी अक्षय या यादीमध्ये 51 व्या स्थानावर होता आणि 2018 मध्ये 270 कोटींची कमाई करुन 76 व्या स्थानावर होता.
100 कोटी कमाईची अपेक्षा आहे :- या मासिकाच्या म्हणण्यानुसार अक्षयच्या कमाईचे मुख्य स्रोत चित्रपट आहेत. रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की तो एक बँकेबल स्टार आहे आणि ‘बच्चन पांडे’ आणि ‘बेल बॉटम’ सारख्या आगामी चित्रपटातून सुमारे 13 मिलियन डॉलर्स (सुमारे 95 कोटी रुपये) मिळवणार आहे.