अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतात लोकडाऊन असूनदेखील रुग्ण संख्या २ लाखांपर्यंत गेली आहे. भारतात मागील दिवसात कोरोना विषाणूचे प्रमाण पाच पटीने वाढले आहे.
या परिस्थितीचा अभ्यास करता जूनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढणार आहेत. 1 मे रोजी भारतात कोरोना रूग्णांची संख्या 37,257 इतकी होती.
1 जूनपर्यंत भारतात कोरोना विषाणूची 1 लाख 90 हजार 535 रुग्णांची नोंद करण्यात आली आहेत. यापैकी ५ हजार 394 लोक मरण पावले आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे ८ हजार 392 रुग्ण आढळले असून 230 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत चोवीस तासात मृतांचा आकडा हा सर्वात जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते आशियाई आणि दक्षिण अमेरिकन देशांसाठी जूनचा महिना फार महत्वाचा आहे.
भारतात लॉकडाऊन चालू असताना एप्रिल आणि मे मध्ये नवीन प्रकरणांची संख्या सातत्याने वाढत होती. 1 जूनपासून भारतात लॉकडाउनच्या ठिकाणी अनलॉक -1 लागू करण्यात आला आहे.
त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगदेखील कमी होईल. अद्यापही बाजारात कोरोनाविरोधात कोणतेही औषध नाही. त्यामुळे जूनमध्ये कोरोनाची संख्या अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews