अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-जगभरात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने सर्वांच्या तोंडाचे पाणी पळवले. अनेक देशांच्या आर्थिक व्यवस्था यामुळे धोक्यात आल्या आहेत.
सर्वांचे लक्ष आता बाजारात येणाऱ्या लशीकडे असतानाच ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशन होऊन तयार झालेल्या नव्या विषाणूने डोके वर काढले आहे.
ब्रिटनमध्ये हे संक्रमण वेगाने वाढत असतानाच ते विविध देशात देखील पोहोचल्याचे लक्षात आले आहे. या विषाणूमध्ये झालेले बदल,
त्याचा परिणाम आणि त्याला रोखण्याचे उपाय शोधण्यासाठी शास्रज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच जण अहोरात्र काम करत आहेत. पण जोपर्यंत याची संपूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत त्याची काही लक्षणं शास्रज्ञांनी सांगितली आहेत.
नव्या विषाणूची लक्षणं :- दररोज नवनवी लक्षणंही सापडत आहेत. यापैकी काही सामायिक लक्षणं अशी आहेत की- ताप येणं, कोरडा खोकला, घसा कोरडा पडणं, सर्दीमुळे नाक वाहत राहणं किंवा नाक चोंदलेलं राहणं,
धाप लागणं आणि छातीत दुखणं, थकवा येणं, गॅस्ट्रोइंटेस्टनल इन्फेक्शन, तोंडाची चव जाणं आणि वास न येणं ही महत्त्वाची लक्षणं आहेत अशी लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
नव्या विषाणूची धोकादायक लक्षणं :- सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शनने एकूण लक्षणांपैकी 5 महत्त्वाची धोकादायक लक्षणं जाहीर केली आहेत.
यामध्ये महत्त्वाच्या लक्षणांमध्ये चेहरा आणि ओठ निळे पडणे याचा देखील समावेश आहे. इतर लक्षणांमध्ये श्वसनास त्रास होणं, गोंधळ उडणं, सतत छातीत दुखणं,
प्रचंड अशक्तपणा आणि जागं राहणं कठीण वाटणं इ. आहेत. ही पाच लक्षणं महत्त्वाची असून तशी लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.