अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- बॉलिवूडमधील अनेक स्टार्स स्वतःच्या नावावर घर घेत असतात . त्यात आता जान्हवी कपुरचे पण नाव आले आहे. आता या यादीत जान्हवी कपूरचे नावही चढले आहे. होय, 23 वर्षाच्या जान्हवीने मुंबईच्या जुहू भागात कोट्यवधीचे घर खरेदी केले आहे.
जान्हवीच्या नावावर आत्तापर्यंत केवळ दोन सिनेमे आहेत आणि तिने खरेदी केलेल्या घराची किंमत 39 कोटी असल्याचे कळतेय. स्क्वेअर फिट इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी 7 डिसेंबरला जान्हवीने घराची डिल फायनल केली. जुहूमधल्या इमारतीत 3456 स्क्वेअर फूटमध्ये घर पसरलेले आहे.
त्याची किंमत थोडीथोडकी नसून 39 कोटी रुपये आहे. यासाठी स्टँप ड्युटीपोटी तिने 78 लाख रुपये भरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरात 6 कारच्या पार्किंगची जागा आहे.
कोरोना काळात जान्हवीच्या आधी आलिया भट्ट आणि हृतिक रोशननेही मुंबईत नवीन घर विकत घेतले. आलियाने रणबीर कपूर राहत असलेल्या इमारतीत नवा आशियाना खरेदी केला तर हृतिकने जुहूमधल्या पेंटहाऊससाठी तब्बल 100 कोटी मोजले.