अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. हा तपास आता NCB ड्रग्ज अँगलने करत आहे.
रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक याला आणि सॅम्युअल यांना एनसीबीने अटक केल्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक केली. रियाने एनसीबीला दिलेल्या 20 पानांच्या कबुली जबाबात गंभीर खुलासे केले आहेत.
यामध्ये रियाने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची नावं घेतली असल्याची माहिती आहे. यानुसार दीपिका पदुकोण, अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात पोहचल्या. काल रकुल प्रीत सिंगची चौकशी करण्यात आली.
एबीबी लाईव्हच्या रिपोर्टनुसार सारा अली खान आणि श्रद्धा कपूर दोघींनाही ड्रग्जसंबंधीच्या चॅटबद्दल अनेक प्रश्न विचारले. NCB च्या चौकशीत साराने ‘केदारनाथ’
सिनेमाच्या शूटिंगवेळी सुशांतला अनेकदा व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेतल्याचे पाहिले असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. सुशांतला कधी व्हॅनिटीमध्ये तर कधी सेटवर देखील ड्रग्ज घेताना पाहिल्याची श्रद्धानेही कबुली दिली आहे.
‘छिछोरे’च्या सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये पवना फार्म हाऊसवर गेली होती तेव्हा त्या पार्टीमध्ये केवळ डान्स केला होता. यावेळी ड्रग्ज घेतले नव्हते असेही तिने सांगितले.
दीपिकाची करिष्मासोबत झालेल्या चौकशी एनसीबीने केलेल्या ड्रग चॅटच्या प्रश्नावर, दीपिकाने ते ड्रग चॅट तिचंच असल्याचं कबुली दिली आहे.
अन्य प्रश्नांची उत्तरे देताना दीपिकाने टाळाटाळ केली NCB ला समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved