अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- सुपरस्टार रजनीकांत हे ब्लड प्रेशरच्या समस्येमुळे शुक्रवारी हैदराबाद येथील अपोलो रूग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
डिस्चार्ज देतेवेळी डाॅक्टरांनी रजनीकांत यांना आरोग्यसंदर्भात कोणतीही समस्या नसून काळजी घेण्याचा सल्ला दिला. डाॅक्टरांनी रजनीकांत यांना कोणत्याही प्रकारचे प्रेशर न घेण्याचा सल्ला दिला असून करोनाच्या धोक्यामुळे कमी प्रमाणात बाहेर जाण्याचे सांगितले आहे.
रजनीकांत यांचा बीपी कमी असून त्यांना बाहेर न जाण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी रक्तदाबात चढ-उतार झाल्यानंतर रजनीकांत यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर त्यांच्यावर डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून होती. डिसेंबरपासून रजनीकांत यांच्या चित्रपटाची शूटिंग चालू होती. त्यांची कोरोना चाचणी पन करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतिविषयी चौकशी केली आहे. त्यांनी त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी शुभेच्छा पण दिल्या आहेत.